Latest

ना पदवी… ना परवाना, मुळव्याध डॉक्टर ! पाथर्डीत ‘बंगाली मुन्नाभाई’ अटकेत

“ज्याच्याकडे डॉक्टरची पदवीच नाही… तो अनेक दिवस रुग्णांवर उपचार करत होता ! पाथर्डीत उघड झाला ‘बंगाली मुन्नाभाई’चा धक्कादायक प्रकार !”

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात बनावट डॉक्टरांचा मोठा भांडाफोड झाला आहे. नाथनगर भागात ‘मुळव्याध भगंदर उपचार केंद्र’ नावाने सुरू असलेल्या दवाखान्यावर आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत गौरव गोवचंद्र विश्वास नावाच्या व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसल्याचे उघड झाले. एवढेच नाही, तर त्याच्याकडे अधिकृत वैद्यकीय पदवीही नव्हती. तरीही तो मुळव्याध आणि भगंदरासारख्या आजारांवर उपचार करत होता.

गुरुवारी सकाळी झालेल्या छाप्यात उपचारासाठी वापरली जाणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर पाथर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोग्य विभागाने जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून अशा बनावट वैद्यकीय व्यवसायिकांवर कठोर कारवाई केली जात आहे. कोणत्याही डॉक्टरकडे उपचार घेण्यापूर्वी त्यांचा परवाना, पदवी आणि नोंदणी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. कारण चुकीचा उपचार जीवासाठी धोकादायक ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button