Latest

अहिल्यानगर जिल्ह्यात परतीच्या पावसाचीही पाठ ! ‘या’ तालुक्यात दुष्काळाचे संकट आणखी गडद; पाहा पावसाची धक्कादायक आकडेवारी

शेतकऱ्यांच्या आशा आता परतीच्या पावसावर होत्या; मात्र या पावसानेही दडी मारल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंता वाढली आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ६६.७ टक्के म्हणजेच २९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २८४.३ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे.

सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती श्रीरामपूर, राहुरी आणि शेवगाव तालुक्यांत आहे. या तिन्ही तालुक्यांत पावसाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षाही कमी राहिले. श्रीरामपुरात ३६ टक्के, राहुरीत ३६.९ टक्के, तर शेवगावमध्ये अवघा ३७.६ टक्के पाऊस झाला.

दुसरीकडे, अकोले तालुक्याने मात्र सरासरी ओलांडली असून, येथे १२६.७ टक्के पाऊस नोंदवला गेला. मात्र, उर्वरित भागांत परिस्थिती गंभीर आहे.

पावसाअभावी खरीप पिकांना फटका बसला असून, जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बीच्या पेरण्यांवरही संकट निर्माण झाले आहे. परतीच्या पावसाची शक्यता कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button