Latest

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या महिला राखीव जागांवर ‘या’ आजी-माजी आमदारांच्या नातेवाईकांची एन्ट्री ! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत दोन महिला राखीव जागांसाठी तब्बल ४४ महिला मैदानात उतरल्या आहेत. विशेष म्हणजे, या लढतीत आजी-माजी आमदारांच्या नातेवाईकांसह राजकीय घराण्यांतील महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या जागांवर नेमकी कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आमदार विठ्ठल लंघे यांच्या पत्नी रत्नमाला लंघे, आमदार विक्रम पाचपुते यांच्या आई प्रतिभा पाचपुते आणि माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी प्रणोती जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी गोविंद शिंदे याही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मात्र, महिला राखीव जागांवर राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना संधी मिळत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे.

याशिवाय अनुराधा नागवडे, गितांजली शेळके, मंजुषा गुंड आणि हर्षदा काकडे यांच्यासह अनेक महिला उमेदवार मैदानात आहेत. आता माघार कोण घेणार आणि अखेरची लढत कोणामध्ये होणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button