Latest

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक… सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, या मार्केटमध्ये मिळाला ६,७५५ रुपयांचा भाव ! पण शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे येणार ?

सोयाबीन उत्पादकांसाठी बाजारातून एकीकडे दिलासादायक बातमी आली आहे, तर दुसरीकडे उत्पादन घटल्याने चिंता वाढली आहे. म्हणून यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळतोय, पण शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार का ? हा मोठा सवाल आहे.

मंडळी, यवतमाळच्या बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल तब्बल ६ हजार ७५५ रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजार समितीत ७ ऑक्टोबर रोजी सोयाबीनचा कमाल दर ६ हजार ६४० रुपयांवर पोहोचला.

या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, यंदा पावसातील अनिश्चितता आणि दीर्घ खंडामुळे सोयाबीनच्या पिकावर परिणाम झाला. अनेक ठिकाणी शेंगांमध्ये दाणे पूर्णपणे भरले नाहीत. त्यामुळे उत्पादन घटलं आणि बाजारातील आवकही कमी झाली.

परिणामी, दरांना आधार मिळाला. पण लक्षात घ्या, जास्त भाव मिळाला म्हणजे जास्त नफा मिळालाच असं नाही. एकरी उत्पादन, लागवडीचा खर्च आणि विक्रीचा दर यावर शेतकऱ्यांचं उत्पन्न ठरतं. म्हणूनच यंदा सोयाबीनचा वाढलेला भाव शेतकऱ्यांना किती फायदा देणार, हा खरा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button