Latest

रील स्टार सनी जाधवचा खोटा चेहरा समोर ! खोट्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

अहिल्यानगरच्या सोशल मीडिया स्टारवर गंभीर आरोप… रील्समधून प्रसिद्धी मिळवणारा सनी जाधव आता थेट पोलिसांच्या रडारवर. सोशल मीडियामध्ये नेहमी चर्चेत असलेले ‘रुबाब उद्योग समूहा’चे प्रमुख आणि रील्स स्टार सनी जाधव मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

सनी जाधव यांच्यासह राजेंद्र जाधव, समीर जहागीरदार, प्रमोद दाणे आणि अक्षय जाधव यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रवी साळुंके यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, अक्षय जाधव यांच्या माध्यमातून त्यांना जाधव नगर येथे भेटीसाठी बोलावण्यात आले होते.

मात्र, तिथे पोहोचल्यानंतर आधीच सापळा रचण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी शिवीगाळ करत रवी साळुंके यांना बेदम मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करत जीवघेणा हल्ला केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मित्रालाही मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सोशल मीडिया स्टार्सच्या वाढत्या दादागिरीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या कोतवाली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंडळी या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा… आणि अशाच अपडेट्ससाठी पेजला फॉलो नक्की करा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button