Latest

Real vs Fake Paneer? FSSAI चा ‘हा’ मोठा निर्णय पाचपुतेंच्या पाठपुराव्याला यश

तुम्ही हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर आवडीने खात असलेलं पनीर खरंच दुधापासून बनलेलं असतं का..? की तुम्ही नकळत ‘अॅनालॉग पनीर’ म्हणजेच केमिकल्स आणि पाम ऑईलपासून बनलेलं नकली पनीर खाताय..? हो, ही गोष्ट आता खूप गंभीर मुद्दा बनलीय.

श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेत प्रत्यक्ष ‘अस्सल पनीर’ आणि ‘अॅनालॉग पनीर’ दाखवून हा मुद्दा लावून धरला होता. आता याची राष्ट्रीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. FSSAI ने आता एक मोठा प्रस्ताव मांडलाय.

दुधाव्यतिरिक्त इतर घटकांपासून बनवलेल्या बनावट उत्पादनांना ‘पनीर’ हे नाव वापरण्यावर, तसं लेबल लावण्यावर आणि जाहिरात करण्यावर थेट बंदी घालण्यात येणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना आता त्यांच्या मेन्यू कार्डवर स्पष्ट लिहावं लागेल की ते कोणतं पनीर वापरत आहेत.

महाराष्ट्रात तर यावर वर्षभराची बंदी आधीच घालण्यात आली होती. या नवीन नियमांमुळे हॉटेल आणि कंपन्यांकडून होणारी ग्राहकांची मोठी फसवणूक थांबणार आहे. त्यामुळे बाहेर जाताना आपण काय खातोय याकडे नक्की लक्ष द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button