Latest

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज ! पुढचे इतके दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार, ऑक्टोबर महिन्यात…

महाराष्ट्रात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक भागांतील शेती संकटात सापडली आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी आजही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशातच हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यांच्या माहितीनुसार, २६ सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाची विश्रांती राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हवामान तुलनेने कोरडं राहू शकतं.

मात्र पूर्व विदर्भात चित्र वेगळं आहे. गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागांत पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचं डख यांनी सांगितलं आहे. यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button