बरोब्बर एक वर्षांपूर्वी म्हणजेच 7 मे 2025 ला भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तानात राखरांगोळी केली होती. पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं होतं. पण आता याच ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान काहीतरी गेम करतंय, अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. तसं पाहिलं तर, पाकिस्तान सद्या भिकेला लागलाय. पण तरीही पाकिस्तान बदला घेण्याची भाषा, नेमकी कुणाच्या जिवावर करतंय, तर चीनच्या… पाकिस्तान चीनच्या जिवावर सध्या उड्या मारतंय. पाकिस्तान व चीन, हे दोन्ही देश मिळून भारताविरोधात काहीतरी गेम करतील अशा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
पहलगाम हल्यात पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला. पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. या घटनेनंतर भारताचं रक्त खळवलं. काही दिवसांत भारतानंही ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ्यांना बेचिराख करुन टाकलं. भारताच्या राफेल आणि सुखोई-30 या विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत न शिरताही केवळ बम्होस मिसाईल वापरुन पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना एकेक करुन नष्ट केलं. पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसचीही अक्षरश नांगरट करुन टाकली.
आता भारतानं पाकिस्तानाच न घुसताही हे सगळं कसं केलं? तर S-400 एअर डिफेन्स सिस्टिममुळे हे शक्य झालं. आता ही S-400 एअर डिफेन्स सिस्टिम भारतानं कुणाकडून घेतली होती, तर रशियाकडून… भारताच्या संसक्षण क्षमतेचा विचार केला, तर भारताकडे सध्या 4.5 पिढीची लढाऊ विमाने आहेत. त्यात फ्रेंच राफेल व रशियन एसयू-30 अशा विमानांचा समावेश आहे.
परंतु रशियाच्या याच एसयू-30 विमानांची क्षमता, इस्त्रायल-इराण युद्धात कुचकामी ठरलेली दिसली. इस्त्रायल-इराण युद्धात इराणने हीच रशियन बनावटीची एअर डिफेन्स सिस्टीम वापरली. परंतु इस्त्रायलनं या सिस्टिमला चकवा देत इराणमध्ये धुमाकूळ घातला. म्हणजेच इस्त्रायलकडं 405 पिढीच्या पुढची लढाऊ विमाने आहेत, हे स्पष्ट झालं.
आता अगदी तसंच, चीननंही पाचव्या पिढीतील लढाऊ विमान तयार केलीत. त्या विमानांचं नाव आहे जे-35. ही विमानं अतिप्रगत समजली जाताहेत. चीनच्या सरकारी टीव्हीने नुकताच J-35 जेटचा एक व्हिडिओ प्रसारित केला. ज्यामध्ये या विमानाची इलेक्ट्रो-ऑप्टिकल टारगेटिंग सिस्टिम किती प्रभावी आहे, हे दाखवण्यात आलं. हे लढाऊ विमान अतिप्रगत नक्कीच आहे.
आता याच विमानाबाबतची भारताची चिंता वाढविणारी एक बातमी, काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवली जात आहे. चीनने हे जे-35 स्टिल्थ फायटर जेट हे फक्त इतर देशांना विकण्यासाठी तयार केल्याचं सांगितलं जातंय. या फायटर जेटचा पहिला खरेदीदार हा पाकिस्तान असेल, अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. पाकिस्तान हवाई दलाने चीनकडून हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान असलेले जे-३५ खरेदी करण्यासाठी ‘प्रारंभिक सहकार्य करारा’वर स्वाक्षरी केली आहे.
पाकिस्तानने आपल्या लढाऊ विमानांचा ताफा मजबूत करण्यासाठी, आपल्या पहिल्या स्टेल्थ फायटरसह चार चिनी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारांची घोषणा केलीय. यामध्ये अतिरिक्त जे-१० सी फायटर विमाने, जेएफ-१७ ची सुधारित आवृत्ती आणि एका अज्ञात लांब पल्ल्याच्या अचूक मारा करणाऱ्या शस्त्राचा समावेश आहे.
आता हे सगळं सुरु असताना, एशिया टाईम्सनं एक धक्कादायक बातमी दिली. ‘एशिया टाइम्स’च्या वृत्तानुसार, हे विमान रडारच्या नजरेत न येता भारताच्या आतील भागांवर हल्ला करून अणुऊर्जा प्रकल्पांसारख्या संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करू शकते. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानविरोधात एस-400 सिस्टिम वापरली होती. चीनने पाकिस्तानला रशियन S-400 सिस्टिमची माहिती दिली असण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानला भारतीय हवाई हद्दीतील जागा शोधणे आणि अचूक निशाणा साधणे सोपे होणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान आता लांब पल्ल्याच्या आणि अचूक मारा करणाऱ्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करत आहे, जे भारतासाठी चिंतेचे कारण ठरू शकते. एवढंच नाही तर, पाकिस्तान हे चीनकडून चार-पाच नाही तर तब्बल 40 फायटर जेट खरेदी करण्याचा विचार करत असल्याच्याही काही बातम्या येऊ लागल्या आहेत. या सगळ्या प्रकारामुळे दक्षिण आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





