Explained

सावधान! CORONA पेक्षा खरतानाक आहे Hantavirus… जगाची झोप उडवणारं हे प्रकरण नेमकं काय?

2019 साली, जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला होता. आता या व्हायरसला जाऊन पाच-एक वर्षे झालीत. कोरोनाचा सुरुवातीचा मृत्यूदर, हा 3 ते 4 टक्केच नोंदवला गेला होता. नंतर जगभरात त्याची तीव्रता वाढल्यावर, तो 10 टक्क्यांपर्यंत वरती गेला. भारतात जून 2020 ते 2021 या काळात सर्वात जास्त मृत्यूदर हा 3.4 ते 8.1 टक्के नोंदवला गेला. पण थांबा… आता जगाची झोप, पुन्हा एका नव्या व्हायरसने उडालीय. त्या व्हायरसच नाव आहे हंता व्हायरस… बरं हा व्हायरस इतका खतरनाक आहे की, त्याचा मृत्यूदर हा कोरोना व्हायरसपेक्षा तब्बल 40 पट जास्त आहे. अमेरिकेतील काही प्रजातींमध्ये हंता व्हायरसचा मृत्यूदर हा 40 टक्क्यांएवढा उच्च नोंदवला गेलाय. काही तासांत या व्हायरसने तीन बळी घेतलेत. आता हा हंता व्हायरस काय? तो कसा पसरतोय? त्यानं तीन बळी कसे घेतलेत? तो किती खतरनाक आहे? त्याचा बचाव कसा करायचा?

कोरोनाच्या महाभयंकर आठवणी ताज्या असतानाच, आता जगाचं टेन्शन वाढविणारी एक बातमी समोर आलीय. एका नव्या विषाणूनं जगात एन्ट्री केलीय. खोल समुद्रात असलेल्या एका जहाजात हा विषाणू आढऴून आलाय. अर्जेंटिनाहून अंटार्टिका आणि मग अटलांटिक महासागरामधून दीर्घ प्रवासासाठी निघालेल्या एका क्रूझमध्ये, हंता विषाणूनं थैमान घातलंय. हे जहाज गेल्या अनेक आठवड्यांपासून सफरीवर आहे. त्याच दरम्यान कोणत्या तरी देशात या जहाजात हंता विषाणू शिरला आणि त्यानं तब्बल तीन बळी घेतलेत. काही बातम्यांनुसार, या जहाजावरील काही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची प्रकृती अचानक बिघडली. यामुळे हे जहाज प्रवासादरम्यान काही बेटांजवळ थांबवावं लागलं.

जहाज दक्षिण अटलांटिक परिसरात असताना ७० वर्षीय डच प्रवासी आजारी पडला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रवाशाच्या मृत्यूचं कारण तपासणीसाठी त्याच्या रक्ताचे अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. महिनाभरानंतर दक्षिण आफ्रिकेतील एका लॅबमध्ये तपासणी केल्यावर या प्रवाशाच्या मृत्यू हंता विषाणूच्या संसर्गामुळे झाल्याचं निदान समोर आलं. त्यावेळी जहाज दक्षिण आफ्रिकेपासून जवळपास ३,५०० किलोमीटर दूरवर खोल समुद्रात होतं. आता हा पोस्टमाँर्टम रिपोर्ट समोर येईपर्यंत या क्रूझमधील आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. एक प्रवासी दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. याशिवाय जहाजावरील आणखी तीन प्रवाशांमध्ये हंता विषाणूची लक्षणं आढळून आली आहेत. त्यांना बाहेर काढण्याची तयारी सुरु आहे.

या जहाजावर आत्तापर्यंत हंता विषाणूची लागण झालेले 8 प्रवासी सापडेल आहेत. विशेष म्हणजे या जहाजावर 23 देशांतले तब्बल 150 प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे या हंताच्या प्रभावात हे सगळेच प्रवासी आले तर जगातील 23 देशांत या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हंता विषाणू हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही, असं सांगितलं जातं. परंतु आता एकाच क्रुइझवरील तब्बल 8 जणांना या विषाणूची लागण झाल्याने आरोग्य तज्ज्ञही बुचकळ्यात पडले आहेत. या विषाणूचा तत्काळ प्रतिबंध केला नाही, तर कोरोना सारखा हा विषाणू जगभर पसरण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

आता हा हंता व्हायरस म्हणजे नेमका काय? ते आपण समजून घेऊ… हंता व्हायरस हा एक विषाणू नाही. तो विषाणूंचा समूह आहे. उंदीर, घुशी अशा कुरतडणाऱ्या प्राणांमध्ये तो आढळतो. या प्राण्यांची विष्ठा, मलमुत्र, किंवा लाळ, जेव्हा मानवी संपर्कात येतात तेव्हा या विषाणूचा प्रसार होतो. उंदराची जागा, अस्वच्छ ठिकाणी जिथे उंदीर, घुशी असतात ते बीळ, या ठिकाणी या विषाणूचा सगळ्यात जास्त धोका असतो. हा विषाणू तीन प्रकारे पसरतो…

पहिलं म्हणजे श्वासावाटे… उंदराच्या उत्सर्जित पदार्थामधील कण हवेत मिसळतात. जेव्हा एखादी व्यक्ती अशा दूषित हवेत श्वासोच्छ्वास घेते तेव्हा हा विषाणी त्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतो.

दुसरं म्हणजे थेट संपर्क… संक्रमीत उंदराच्या विष्ठेला किंवा मलमुत्राला एखाद्या व्यक्तीचा स्पर्श झाला तर, नाक, तोंड, डोळे किंवा तोंडावाटे तो माणसाच्या शरीरात जातो.

आणि तिसरं म्हणजे दंश… संक्रमीत उंदराने किंवा घुशीने एखाद्या माणसाला चावा घेतला तर, या विषाणूची बाधा होऊ शकते.

या आजाराची लक्षणे कोणती? तेही समजून घेणं महत्त्वाचं आहे….

– हंताव्हायरसची लक्षणे दिसण्यासाठी 1 ते 8 आठवड्यांचा काळ लागू शकतो.
– सुरुवातीला हा आजार सामान्य फ्लू वाटू शकतो. पण लगेच दवाखान्यात जाणं सुरक्षित ठरतं.
– तीव्र ताप आणि थंडी वाजणे.
– स्नायू दुखणे आणि थकवा जाणवणे.
– प्रचंड डोकेदुखी आणि चक्कर येणे.
– काही दिवसांनंतर श्वास घेण्यास त्रास होणे.
– मळमळ, उलट्या आणि पोटदुखी.

ही सगळी लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा…

या आजारापासून बचाव अगदी साधा व सोप्पा आहे. ज्या घरात उंदीर, घुशी किंवा करतडणारे प्राणी असतील, त्या प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा. उंदरांनी कुरतडलेले अन्न खाणे टाळावे. अनेक शेतकऱ्यांच्या गव्हाच्या अथवा धान्याच्या राखीत उंदीर असतात. ते धान्यांचे पोते फोडतात व कुरडतात. उंदरांनी सांडलेले धान्य खाणे टाळावे, हा सगळ्यात मोठा बचाव आहे. ज्या ठिकाणी आपण धान्य ठेवतो, ती जागा स्वच्छ ठेवावी, हाही बचाव आहे. कोणत्याही आजाराला न घाबरता त्याच्यापासून बचाव केला जाऊ शकतो. भारतात आत्तापर्यंत या आजाराचा शिरकाव झाला नसला तरी, काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button