एलियन्स आहेत का? तर अनेकांच्या मते आहेत. मात्र अमेरिका किंवा इतर प्रगत देश हे मान्य करत नाहीत. हा, पण ब्रम्हांडात काहीतरी अदृष्य शक्ती आहे, हे मात्र सगळेच मान्य करतात. 1947 मध्ये न्यू मॅक्सिकोमध्ये राँसवेल येथे एक कथित उडती तबकडी सापडली. त्यालाच यूएफओ संबोधले गेले. ही तबकडी अमेरिकेनं ताब्यात घेतली आणि ती नेवाडा टेस्ट अॅण्ड ट्रेनिंग रेंजमध्ये ठेवली. याच परिसरातला एरिया-51 हे नाव दिलं गेलं. इथं या तबकडीसंबंधी काही प्रयोग सुरु आहेत. अमेरिका या एरियात कुणालाच येऊ देत नाही. अगदी पक्षीही येथून उडू शकत नाही. शसस्त्र सैनिक आणि सेन्सर्सनी हा परिसर बंद करण्यात आला आहे.
येथेच परग्रहावरील जीवसृष्टी आणि अवकाशातील काही घटनांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. आता अमेरिका हे सगळे शोध सार्वजनिक का करत नाहीत? हा प्रश्न होता. तब्बल 75 वर्षांपासून अमेरिकेने याबाबत काय-काय शोध लावले ते गूढच होतं. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर, त्यांनी या शोधांना एकेक करुन सार्वजनिक करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी यूएफओ फाईल्सचा पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला. त्यात अमेरिकेने असे काही धक्कादायक व्हिडीओ, फोटो व पुरावे दिले की, एलियन्स खरंच आहेत का, या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. आता हा पहिला भाग काय? अमेरिकेने काय प्रसिद्ध केलंय? एलियन्स खरंच आहेत का?
तुम्हाला हा विषय समजून घ्यायचा असेल तर, पहिल्यांदा राॅसवेल घटना समजून घ्यावी लागेल. न्यू मॅक्सिको येथील राँसवेल येथे 1947 साली एक कथित तबकडी सापडली. ही आकाशात उडताना येथे पडली. राँसवेल येथे तिचे काही अवशेष सापडले. ही तबकडी परग्रहावरील लोकांची म्हणजेच एलियन्सची असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर अमेरिकेने ती तबकडी त्यांच्या ग्रुम लेकच्या काठावर वसलेल्या नेवाडा ट्रेनिंगमध्ये हलवली. हा परिसर अमेरिकेचे हवाई दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. तेथे या तबकडीवर संशोधन सुरु झाले. आता गेल्या 80 वर्षांत यावर काय संशोधन झाले, हे अमेरिकेने कुणालाच सांगितले नाही.
शिवाय या प्रशिक्षण केंद्रातील काही शास्त्रज्ञ फक्त परग्रहावरील तंत्रज्ञानाचात आभ्यास करत आहेत. परंतु त्यांचे इतर कोणतेही संशोधन अमेरिकेने आत्तापर्यंत जाहीर केले नव्हते. बिल क्लिंटनपासून बराक ओबामापर्यंतच्या सगळ्याच राष्ट्राध्यक्षांनी एरिया-51 चा उल्लेख केला होता. तेथे संशोधन सुरु आहे, असं वेळोवेळी सांगितलं होतं, परंतु कोणत्याच राष्ट्राध्यक्षांनी तिथं काय संशोधन झालंय किंवा काय सुरु आहे, हे जगाला सांगितलं नाही. हे एरिया-51 हे प्रकरण अत्यंत गुप्त ठेवलं गेलं. एका बातमीनुसार, एरिया-51 मध्ये अत्यंत गुप्त रहस्यांचा शोध लागलाय. अमेरिकेच्या 54 टक्के लोकांना असं वाटतं की, अमेरिका ते संशोधन गुप्त ठेवतंय. उघड करत नाही.
परंतु आता, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, बहुचर्चित यूएफओ फाईल्सचं पहिलं प्रकरण प्रसिद्ध केलं. ट्रम्प प्रशासनाने शेकडो नवीन व्हिडिओ, फोटो आणि जुने सरकारी रेकॉर्ड सार्वजनिक केले. या फाइल्समध्ये NASA च्या अपोलो मिशनशी संबंधित छायाचित्रे आणि अंतराळवीरांच्या संवादाचे काही टेप्स सार्वजनिक करण्यात आले. NASA च्या अपोलो 12 आणि अपोलो 17 मिशनशी संबंधित छायाचित्रे आणि संवादाचे रेकॉर्ड सर्वाधिक चर्चेत आले. आता अमेरिकेनं जे सार्वजनिक केलं, ते अगदीच धक्कादायक होतं. आता अमेरिकेनं काय-काय प्रसिद्ध केलंय, ते पाहू…
एका छायाचित्रात चंद्राच्या पृष्ठभागावर आकाशात तीन रहस्यमय बिंदू दिसल्याचा दावा करण्यात आला आहे.
सर्वात मनोरंजक भाग अपोलो 17 मिशनचा ट्रान्सक्रिप्ट मानला जात आहे. यात अंतराळवीर उड्डाणादरम्यान अंतराळयानाजवळ चमकणाऱ्या वस्तू दिसल्याचे बोलताना ऐकू येत आहेत.
पेंटागॉनने प्रसिद्ध केलेल्या या पुराव्यांमध्ये 1999 च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एफबीआयने घेतलेली काही छायाचित्रे देखील आहेत. यामध्ये अमेरिकन सैन्य विमानांजवळ काही रहस्यमय वस्तू दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सैन्य वैमानिकांनी घेतलेली छायाचित्रे देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत, ज्यात वेगवान वस्तू विमानांजवळून जाताना दिसत आहेत.
नवीन यूएफओ (UFO) फाईल्समध्ये ओमानच्या आखातावर दिसलेल्या एका रहस्यमय वस्तूचे छायाचित्र समोर आले आहे. दावा करण्यात आला आहे की, 2024 मध्ये इन्फ्रारेड सेन्सरने वेगवान उडणाऱ्या अश्रूच्या आकाराच्या या वस्तूला रेकॉर्ड केले होते.
१९८९ मध्ये, बॉब लाझार नावाचा एक माणूस टीव्हीवर आला आणि त्याने असा दावा केला की त्याने येथे परग्रहवासीयांच्या अंतराळयानांवर काम केले होते, ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. त्याबाबत मात्र अमेरिकेने काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.
अमेरिकेने या एरिया-51 चे दरवाजे उघडले तर आतमध्ये नेमकं काय संशोधन सुरु आहे आणि अंतराळाबाबत अमेरिकेला काय-काय सापडलंय, हे स्पष्ट होईल. अमेरिका अजूनही एलियन्स आहेत, असा दावा करत नाही. परंतु त्यांनी प्रसिद्ध केलेले काही फोटो व व्हिडीओ पाहिले तर एलियन्स नक्कीच आहेत, यावर विश्वास बसतो.





