Latest

अहिल्यानगरमध्ये कांद्याचे रेट पुन्हा ३ हजारांच्या उंबरठ्यावर ! आणखी किती दिवस टिकणार भाव ?

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे ! राहुरी बाजार समितीत दर्जेदार कांद्याला पुन्हा प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळू लागला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठवड्यातील व्यवहारानुसार दर्जेदार कांद्याला अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. विशेष म्हणजे २० जुलैच्या लिलावात तब्बल ९० गोण्यांना ३ हजार रुपयांचा कमाल भाव मिळाल्याने गुणवत्तापूर्ण कांद्याला बाजारात मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२,७०५ ते २,८०० रुपये दर मिळालेल्या गोण्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. कांदा निर्यातदार योगेश महाजन यांच्या मते, देशभरात कांद्याची मागणी कायम असल्यामुळे दिवाळीपर्यंत बाजारभाव समाधानकारक राहण्याची शक्यता आहे.

मात्र पुढील काळात आवक वाढली किंवा कमी झाली, तर त्यानुसार दरात काही प्रमाणात चढ-उतार होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button