Latest

आता टँकरमधून मिळणार फिल्टर पाणी ; अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

अहिल्यानगरमधून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलीये. आता टँकरमधून थेट फिल्टर केलेलं शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार आहे आणि विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे.

मंडळी, उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे वाडी-वस्तीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण अनेकदा या पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत होत्या. हे लक्षात घेऊन आता प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय.

टँकर भरल्या जाणाऱ्या ठिकाणीच अत्याधुनिक फिरते फिल्टर बसवले जाणार आहेत. म्हणजेच, टँकरमध्ये भरण्यापूर्वीच पाणी शुद्ध केलं जाईल आणि तेच पाणी थेट नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.

ही माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. यासाठी जिल्हा नियोजनातून निधीही मंजूर करण्यात आला आहे. पाणी फिल्टर करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे.

प्रत्येक वाडी-वस्तीवर लोकसंख्येनुसार टाक्या बसवून पाणी वितरण केलं जाणार आहे.

या संपूर्ण व्यवस्थेचं नियोजन ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर सोपवण्यात आलं आहे.

मंडळी, हा प्रयोग यशस्वी झाला, तर पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेत मोठा बदल घडू शकतो. विशेषतः ग्रामीण भागासाठी हा एक मोठा दिलासा ठरेल. तुम्हाला काय वाटत?कमेंट करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button