
मंडळी यापूढे लग्नासाठी ट्रक किंवा पिकअपची गरज नाही ! कारण आता शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात एसटी बस मिळणार आहे. राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी ही दिलासादायक घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली आहे.
अनेक गावांमध्ये लग्नसमारंभासाठी ट्रक किंवा इतर अवैध वाहनांचा वापर केला जातो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. ही समस्या लक्षात घेऊन, नवीन एसटी बसचा ताफा सेवेत आल्यानंतर शेतकरी कुटुंबांनी लग्नासाठी बसची मागणी केल्यास, एसटी महामंडळ शक्य तितक्या त्यांच्या दारापर्यंत बस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे
. यासोबतच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यांचे परवानेही रद्द केले जाणार आहेत. राज्यात ८,३०० नवीन एसटी बस टप्प्याटप्प्याने दाखल होत असून अनेक मार्गांवर बसची वारंवारता वाढवली जाणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर मग मंडळी तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा हा नवा निर्णय कसा वाटला? हे कमेंट करून नक्की कळवा.





