Latest

सरकारला नाही जमलं ते नानांनी करून दाखवलं….! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘हे’ गाव कधीच विसरणार नाही नाना पाटेकरांचे काम

काही माणसं आपल्या अभिनयाने मन जिंकतात, तर काही आपल्या माणुसकीने आयुष्यभरासाठी हृदयात घर करतात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोगलगावशी असंच एक जिव्हाळ्याचं नातं होतं!

नेवासा तालुक्यातील गोगलगावमध्ये नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे आदर्श गावातील काम पाहण्यासाठी अनेकदा आले होते. नानांच्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सरपंच योगेश म्हस्के यांनाही काम करण्याची संधी मिळाली.

गावातील ५८ कुटुंबांना शासकीय लाभ मिळाला होता, मात्र त्यांच्या घरात शौचालयांची सुविधा नव्हती. ही गरज ओळखून नानांनी या कुटुंबांसाठी शौचालये उपलब्ध करून दिली. एवढंच नाही, तर गावासाठी १० लाख रुपयांचे वॉटर फिल्टर युनिट आणि त्यासाठी स्वतंत्र खोलीही बांधून दिली.

गावातील मंदिर आणि मशीद समोरासमोर असल्याचं पाहून नानांनी धार्मिक सलोख्याचाही संदेश दिला होता. नानांच्या निधनाने पितृतुल्य व्यक्ती हरपल्याची भावना योगेश म्हस्के यांनी व्यक्त केली.

नानांनी दाखवलेल्या माणुसकीच्या वाटेवर पुढेही चालत राहण्याचा निर्धार त्यांनी केला. नाना फक्त पडद्यावरचे अभिनेते नव्हते तर अनेकांसाठी ते आयुष्याला आधार देणारे व्यक्तीमत्व सुद्धा होते !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button