Latest

नगरी कांद्याने गाठला नवा उच्चांक ! इथं मिळतोय ६० रुपये किलोचा विक्रमी भाव !

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या बाजारातून मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मंडळी, जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी झालेल्या लिलावात गावरान कांद्याला तब्बल ६० रुपये प्रति किलोचा विक्रमी भाव मिळाला.

चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या १३० गोण्यांना ५४ ते ६० रुपये किलो दर मिळाला. तर दोन नंबर गावरान कांद्याला ५२ ते ५३ रुपये किलो भाव मिळाला. विशेष म्हणजे, गोल्टी कांद्यालाही ३५ ते ४३ रुपये किलोचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला.

या दिवशी बाजार समितीत तब्बल २१ हजार ७८९ कांदा गोण्यांची आवक झाली. आवक मोठी असतानाही कांद्याची मागणी कायम असल्याने दरात वाढ झाली आहे. पारनेरसोबतच शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरीही दर्जेदार कांदा येथे विक्रीसाठी आणतात.

आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळसह विविध राज्यांतून मागणी असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी घाईत कांदा विकण्याऐवजी चांगल्या प्रतीचा कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button