Latest

चॅटिंगच्या वादातून मंत्र्यांच्या अहिल्यानगरमधील OSD कडून पत्नीला मारहाण; पुण्यात गुन्हा दाखल

चॅटिंगच्या वादातून मंत्र्यांचे OSD म्हणून कार्यरत असलेले विजय धुळचंद कारंडे यांनी पत्नी रुपाली विजय कारंडे यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी रुपाली कारंडे यांनी मोबाईलमधील चॅटिंगबाबत विचारणा केली असता आरोपी विजय कारंडे संतापले. त्यानंतर त्यांनी घरातील लाकडी बॅटने पत्नीवर हल्ला करत मारहाण केली. या घटनेत महिलेच्या पाठ, मांडी व पायांवर गंभीर दुखापत झाली.

तसेच, पत्नीचा गळा व नाक दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या दरम्यान मध्ये पडलेल्या मुलालाही आरोपीने मारहाण केल्याची माहिती आहे.

घटनेनंतर पीडित महिला मुलासह घराबाहेर पडून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली आणि नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 109(1), 118(1), 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button