Latest

नवा आदेश ! पाचव्यांदा वाहतुकीचा नियम तोडल्यास वाहन परवाना होणार थेट रद्द

वाहनचालकांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आता वाहतुकीचे नियम वारंवार तोडणे खूप महागात पडणार आहे. कारण पाचव्यांदा नियम तोडला, तर थेट तुमचं लायसन्स रद्द होऊ शकतं.

मंडळी, केंद्रीय मोटार वाहन कायद्यात मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार एका वर्षात पाच वेळा वाहतुकीचे नियम तोडल्यास संबंधित वाहनाची नोंदणी आणि चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर हा नियम आता सर्व जिल्ह्यांमध्ये लागू केला जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर थेट कठोर कारवाई होणार आहे.

आतापर्यंत नियम मोडल्यास दंड भरून अनेकजण पुन्हा वाहन चालवत होते. पण आता वारंवार नियम तोडणाऱ्यांवर थेट लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

सरकारच्या मते, वारंवार नियम तोडणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढते. त्यामुळे रस्ते सुरक्षा वाढावी आणि अपघात कमी व्हावेत, यासाठी हा कडक निर्णय घेण्यात आला आहे.

मंडळी, ही माहिती प्रत्येक वाहनचालकापर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडीओ शेअर करा, लाईक करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button