Latest

बंटी जहागिरदार हत्याकांडात मोठा ट्विस्ट…! कृष्णा शिनगारेला जामीन; श्रीरामपुरात समर्थकांचा जल्लोष… फटाके अन् पेढे वाटप !

श्रीरामपूरला हादरवणाऱ्या अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. मंडळी, या हत्याकांडात गोळीबाराचा आरोप असलेला आरोपी कृष्णा शिनगारे याला संभाजीनगर खंडपीठाने २९ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे.

३१ डिसेंबर २०२५ रोजी पैशांच्या व्यवहारातून झालेल्या कथित वादानंतर श्रीरामपूरमधील जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रोड परिसरात बंटी जहागिरदार यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत त्यांची हत्या झाली होती.

या प्रकरणात कृष्णा अरुण शिनगारे व रवींद्र गौतम निकाळजे हे दोघेही अवघ्या दोन दिवसांत पोलिसांसमोर हजर झाले होते. दरम्यान, कृष्णाला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या मित्रपरिवाराने फटाके फोडून, पेढे वाटून आणि सोशल मीडियावर स्टेटस ठेवत आनंद व्यक्त केलाय.

मात्र, या जामिनामुळे हत्याकांड पुन्हा चर्चेत आलं असून, पुढील तपास आणि इतर आरोपींवरील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button