Latest

श्रीगोंद्यातील भगर विषबाधा प्रकरणात मोठी घडामोड ! FDA ची एन्ट्री, ‘या’ संबंधित दुकानाचा थेट परवानाचं केला रद्द !

नवरात्रीचा उपवास करायचा म्हणून भगर पीठ खरेदी केलं… पण ते खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांची तब्येतच बिघडली! कुणाला उलट्या, कुणाला जुलाब, तर कुणाला चक्कर आणि थरथर कापण्याचा त्रास झाला. आता या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

ही घटना आहे श्रीगोंदा फॅक्टरी येथील. दत्तात्रय घालमे यांच्या किराणा दुकानातून नागरिकांनी नवरात्रोत्सवाच्या उपवासासाठी भगर पीठ खरेदी केलं होतं. मात्र, या पिठाचं सेवन केल्यानंतर अनेकांना त्रास सुरू झाला.

परिस्थिती अशी झाली की, काही नागरिकांना उपचारासाठी थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आणि अन्नाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले.

यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. एफडीएचे सहआयुक्त सोपान इंगळे यांनी घालमे किराणा दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. निलंबनाच्या काळात विनापरवानगी दुकान सुरू ठेवलं, तर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

पण महत्त्वाचं म्हणजे, विषबाधेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भगर पिठाच्या नमुन्यांचा प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button