Latest

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर ! १३ कोटी लोक अन फक्त १३,५३० ऍम्ब्युलन्स; जिल्हानिहाय आकडेवारी तर फारच शॉकिंग

मंडळी, महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास १३ कोटींवर पोहोचली आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार, संपूर्ण राज्यात शासकीय आणि खासगी मिळून फक्त १३,५३० रुग्णवाहिका नोंदणीकृत आहेत. म्हणजे जवळपास ९,५०० नागरिकांमागे केवळ एकच रुग्णवाहिका उपलब्ध आहे.

ही आकडेवारी आरोग्य व्यवस्थेसमोरील मोठे आव्हान अधोरेखित करते. विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात आजही अनेक रुग्णांना खाट, दुचाकी किंवा खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्याची वेळ येते.

अशा परिस्थितीत उपचारासाठी होणारा प्रत्येक मिनिटाचा विलंब जीवघेणा ठरू शकतो. याहून महत्त्वाची बाब म्हणजे, नोंदणीकृत रुग्णवाहिकांपैकी प्रत्यक्षात किती सेवा देत आहेत आणि किती बंद किंवा दुरुस्तीसाठी उभ्या आहेत, याची स्पष्ट माहितीही उपलब्ध नाही.

आरोग्य सुविधा ही चैनीची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार रुग्णवाहिकांची संख्या, त्यांचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button