
लग्नाचा खर्च ऐकून टेन्शन येतंय ? कर्ज काढून लग्न करण्याचा विचार करत असाल, तर थांबा ! महाराष्ट्र सरकारची एक खास योजना तुमच्या लग्नासाठी आर्थिक मदत देऊ शकते.
मंडळी, अनेक कुटुंबांसाठी लग्नाचा खर्च हा मोठा आर्थिक भार असतो. यासाठी अनेकजण कर्ज घेतात आणि नंतर वर्षानुवर्षे ते फेडत राहतात. पण महाराष्ट्र सरकारची ‘प्रथम विवाह खर्च योजना’ या ओझ्यात काही प्रमाणात दिलासा देऊ शकते. ही योजना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळा मार्फत राबवली जाते.
या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराला त्याच्या पहिल्या विवाहासाठी 30 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो.
अर्जासोबत आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, बँक पासबुक, रहिवासी पुरावा, विवाह प्रमाणपत्र आणि पहिल्या विवाहाचे प्रतिज्ञापत्र अशी कागदपत्रे जोडावी लागतात. मदतीची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. जर तुमच्या कुटुंबात लग्न ठरलं असेल, तर या योजनेची माहिती नक्की तपासा आणि पात्र असल्यास लाभ घ्या.





