Latest

काळे-कोल्हे आता एकत्र? कोपरगावातील राजकारणात ऐतिहासिक ट्विस्ट

कोपरगावच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळालाय. कालपर्यंत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नेते आता एकाच मंचावर एकत्र दिसले आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं.

मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे आणि विधान परिषदेचे नवे आमदार विवेक कोल्हे हे दोघे कोपरगावात एका सरकारी कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमाला दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, दोघांनीही अधिकाऱ्यांना विकासकामे जोमाने करण्याचा सल्ला दिला. राजकीय आखाड्यात कायम एकमेकांविरोधात असलेले काळे आणि कोल्हे आता महायुतीत एकत्र काम करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत.

गटबाजी कायम असली तरी सहमतीच्या राजकारणाची सुरुवात झाल्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळाले. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोपरगावातील एक जुनी राजकीय परंपरा आज पुन्हा सुरू झाली.

सरकारी कार्यक्रमात विधान परिषदेच्या आमदारासाठी एक खुर्ची राखीव ठेवण्याची परंपरा काही काळ खंडित झाली होती, ती आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

काळे कोल्हे वेगवेगळ्या पक्षात असले, तरी महायुतीमुळे पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. मंडळी, हा फक्त एक कार्यक्रम नाही तर कोपरगावच्या राजकारणात बदलाचे संकेत देणारा मोठा क्षण मानला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button