Latest

IPL Fever की Gambling Trap? गावागावात वाढतंय आयपीएल सट्टेबाजीचं जाळं

आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सट्टेबाजीचे जाळे वेगाने पसरत असून यामुळे तरुणांचे भवितव्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सोनई, Shani Shingnapur आणि घोडेगाव परिसरात छुप्या पद्धतीने सट्टा खेळवला जात असल्याची चर्चा असून अनेक तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी होत आहेत.

या सट्टेबाजीमुळे लाखो रुपयांची उलाढाल होत असून अनेक युवक मोठ्या प्रमाणात पैसे गमावून कर्जबाजारी झाले आहेत, तर काहींवर गाव सोडण्याची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरातही असे प्रकार सुरू असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

पोलिसांना याची माहिती असूनही ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा असून “तेरी भी चूप, मेरी भी चूप” पद्धतीने हा सट्टा गुपचूप सुरू असल्याने अनेक प्रकरणे उघडकीस येत नाहीत. यामुळे सट्टेबाजांचे जाळे अधिक बळकट होत असून आर्थिक आणि मानसिक ताणामुळे कुटुंबांवर गंभीर परिणाम होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button