Latest

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचे… रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग बंद ! कारण काय?

मंडळी, रेल्वेने रात्री प्रवास करत असाल आणि मोबाइल किंवा लॅपटॉप चार्जिंगला लावण्याची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे बोर्डाने रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत डब्यांमधील चार्जिंग पॉइंटचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत. नेमकं कारण काय? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, दक्षिण पूर्व रेल्वे विभागात चार्जिंग सुरू असताना एका प्रवाशाची पॉवर बँक फुटली आणि त्यातून धूर निघाला. या घटनेनंतर रेल्वे बोर्डाने २६ ऑक्टोबर रोजी सर्व रेल्वे विभागांना पत्र पाठवून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.

विशेष म्हणजे, हा नियम नवीन नाही. जून २०१४ मध्येच रेल्वे बोर्डाने रात्रीच्या वेळी चार्जिंगची जोडणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वे डब्यात आग लागण्याचा धोका कमी करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

आता या नियमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांवर असेल. वरिष्ठ अधिकारी अचानक तपासणीही करणार आहेत.
त्यामुळे रात्री प्रवास करताना मोबाइल चार्जिंगचं नियोजन आधीच करा. तर मग मंडळी, तुम्हाला हा नियम माहीत होता का? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button