Latest

कुठे किती पाणी? सरकार ठेवणार प्रत्येक थेंबाचा हिशोब ! महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘जल सातबारा’

“आता पाण्याचाही सातबारा निघणार!”महाराष्ट्र सरकारचा देशातील पहिला मोठा प्रयोग चर्चेत आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “जल सातबारा” संकल्पना जाहीर केली आहे.

जमिनीच्या ७/१२ प्रमाणे आता गाव आणि शहरातील पाण्याचाही संपूर्ण हिशोब ठेवला जाणार आहे. कुठे किती पाणी उपलब्ध आहे, किती वापरले जाते, कुठे पाण्याची कमतरता आहे आणि कोणत्या भागात पाण्याची उधळपट्टी होते, याची माहिती या जल सातबारात नोंदवली जाईल.

या उपक्रमामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे सोपे होणार आहे. ज्या भागात पाणीटंचाई आहे, तिथे जलस्रोत पुनर्भरण, जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्रातील एका गावात आणि एका नगर परिषदेत प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. IIT Bombay चे तज्ज्ञ आणि विविध विभागांचे अधिकारी या प्रकल्पावर काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button