
मित्रांनो, आषाढी एकादशीला मुख्यमंत्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करतात, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांच्या शेजारी बसणारं वारकरी दाम्पत्य नेमकं कसं निवडलं जातं, हे तुम्हाला माहिती आहे का ?
तर मंडळी, १९७३ पासून शासकीय महापूजेची परंपरा सुरू झाली आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याची निवड करण्याची जबाबदारी मंदिर समितीकडे देण्यात आली.
आषाढीच्या आदल्या रात्री दर्शनरांग थांबवल्यानंतर समिती रांगेतील पहिलं पती-पत्नी दाम्पत्य शोधते. त्यानंतर त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का, म्हणजे ते वारकरी संप्रदायाचे आहेत का, याची खात्री केली जाते.
सर्व निकष पूर्ण झाल्यावर त्या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळतो. पूजनानंतर मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार केला जातो आणि एक वर्षासाठी एसटीचा मोफत प्रवास पासही दिला जातो. म्हणजे हा मान कोणत्याही शिफारशीने नाही, तर परंपरा, नियम आणि विठ्ठलाच्या कृपेने मिळतो. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.





