Latest

श्रीरामपूरमधील गुंडगिरी समूळ नष्ट होणार ! काय आहे एसपी मुम्मका सुदर्शन यांचा मास्टरप्लॅन ?

कोणी धमकावत असेल, खंडणी मागत असेल किंवा दहशत पसरवत असेल… तर आता थेट पोलीस तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत !
श्रीरामपूरमध्ये व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांशी संवाद साधताना जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी शहरात बीट इन्चार्ज प्रणाली लागू करण्याची घोषणा केली.

या प्रणालीमध्ये संपूर्ण पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र लहान-लहान भागांमध्ये, म्हणजेच ‘बीट’मध्ये विभागले जाते. प्रत्येक बीटची जबाबदारी एका विशिष्ट पोलीस अधिकाऱ्याकडे दिली जाते. त्यामुळे त्या भागातील नागरिकांशी थेट संपर्क वाढतो, स्थानिक समस्या लवकर समजतात आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे सोपे होते.

बैठकीत व्यापाऱ्यांनी खंडणी, एमआयडीसीतील असुरक्षितता, ड्रग्जचा वाढता वापर, मोबाईल चोरी, अतिक्रमण आणि इतर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

पोलिसांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले असून, शाळांच्या परिसरात विशेष गस्त आणि आपत्कालीन मदतीसाठी ११२ हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहनही केले. तुमच्या मते, बीट इन्चार्ज प्रणालीमुळे श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीवर आळा बसेल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button