Latest

जुलै अखेरीस पावसाचा तडाखा ; ऑगस्ट सुरु होताच मान्सून घेणार विश्रांती ?

महाराष्ट्रात सध्या सर्वदूर पाऊस होतोय. पण ऑगस्टपासून चित्र बदलणार का ? तर मंडळी, गेल्या काही दिवसांपासून राज्यभर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक आणि कोकणातील अनेक भागांत पावसाने जनजीवन विस्कळीत केले.

काही ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आले आहेत. मात्र हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, २६ जुलैनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

जुलैअखेरीस काही भागांत जोरदार सरी कायम राहतील, पण ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागांत पावसाची तीव्रता घटू शकते.

तरीही कोकण, घाटमाथा आणि काही डोंगराळ भागांत अधूनमधून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि दरडप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकरी आणि नागरिकांनी पुढील काही दिवस अधिकृत हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button