Latest

अहिल्यानगरमध्ये पुढील दोन दिवस उष्मालाटेचा इशारा ! दुपारी घराबाहेर पडताना आता विशेष काळजी घ्या…

अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अशातच आता भारतीय हवामान विभाग यांनी १२ मे ते १४ मे दरम्यान जिल्ह्यासाठी उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आणि दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. सध्या सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे, तर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. यामुळे शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि ग्रामीण भागातही दुपारच्या वेळेत शुकशुकाट दिसत आहे.

आरोग्य विभागाने विशेष सूचना देत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे. फक्त माणसेच नाही, तर पशू आणि पक्ष्यांनाही उष्णतेचा फटका बसत आहे. यामुळे प्रशासनाने पशुपालकांना जनावरांसाठी सावली आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.

पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मंडळी तुमच्या भागात तापमान किती आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा… आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पेज फॉलो करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button