Latest

जामखेड – श्रीगोंदा रस्त्यावर कार आणि आयशर टॅम्पो यांची समोरासमोर धडक ! दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड–कर्जत रोडवर पाटोदा गरडाचे गावाजवळील वळणावर भीषण अपघात झाला. चारचाकी कार आणि आयशर टॅम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी प्रचंड होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात श्रीगोंदा तालुक्यात शासकीय सेवेत कार्यरत असलेले निखिल मोतीलाल बहुरे आणि रामचंद्र महाजन बहुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मदत करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र दोघांचाही जीव वाचू शकला नाही.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आयशर टॅम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button