Latest

खुशखबर ! १२.३५ रू. दराने कांदा खरेदी करणार ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलीये. सरकारने कांदा खरेदीबाबत मोठी घोषणा केली आहे. मंडळी, राज्यात सध्या कांद्याचे दर अक्षरशः कोसळले आहेत. काही ठिकाणी तर ४ ते ५ रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे.

लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करूनही उत्पन्न मात्र हजारांत मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केलाय.

राज्य सरकार १२ रुपये ३५ पैसे प्रति किलो या दराने कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती.

मात्र, शेतकऱ्यांची मागणी अजूनही कायम आहे. किमान २० रुपये हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. कारण उत्पादन खर्च लक्षात घेतल्यास १२ रुपये ३५ पैसे हा दरही अपुरा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मंडळी, आता या निर्णयामुळे बाजारात किती बदल होतो आणि शेतकऱ्यांना खरोखर दिलासा मिळतो का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button