Latest

तरुणांसाठी खुशखबर ! जर्मनीत कमवा आणि शिका; नोकरीही मिळणार, पहा राज्य सरकारची खास योजना..

तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता महाराष्ट्रातील युवक-युवतींना थेट जर्मनीमध्ये जाऊन शिकण्याची, कमावण्याची आणि कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

मंडळी, राज्य सरकारने जर्मनीतील नामांकित कंपन्यांसोबत करार करून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी विशेष रोजगार आणि प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जर्मनीमध्ये प्रशिक्षण दिले जाणार असून, विशेष म्हणजे प्रशिक्षण घेत असतानाच उमेदवारांना दरमहा २४ हजार रुपयांपासून ते ९५ हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड देखील मिळणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना जर्मनीमध्ये कायमस्वरूपी २ लाख पगाराची नोकरीही मिळणार आहे. फूड प्रोसेसिंग, लॉजिस्टिक्स, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, मेटल बिल्डर आणि मशीन ऑपरेटर अशा आठ महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ही संधी उपलब्ध असून हा उपक्रम मुख्यमंत्री आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या पुढाकाराने राबवला जात आहे.

या योजनेसाठी आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय साधारणपणे १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. जर्मन भाषेचे प्राथमिक ज्ञान, वैध पासपोर्ट आणि शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे.

मंडळी, परदेशात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. म्हणून ही माहिती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button