Latest

शिक्षकांसाठी Good News ! 8 व्या वेतन आयोगामुळे पगार होणार 1.34 लाख ?

8 वा वेतन आयोग लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी मोठ्या पगारवाढीच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत, कारण विविध शिक्षक संघटनांनी केंद्र सरकारकडे दमदार प्रस्ताव सादर केले आहेत.

लेव्हल-1 कर्मचाऱ्यांसाठी 50 ते 60 हजार रुपये आणि लेव्हल-6 कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 1.34 लाख रुपयांपर्यंत पगार वाढवण्याची मागणी केली आहे, या प्रस्तावांनुसार शिक्षकांचा बेसिक पगार फिटमेंट फॅक्टर 2.62 वरून 3.83 करण्याची आणि वार्षिक इन्क्रीमेंट 6 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे पगारात दरवर्षी मोठी वाढ होऊ शकते.

याशिवाय HRA 12%, 24% आणि 36% पर्यंत वाढवणे, ट्रान्सपोर्ट अलाऊन्स किमान 9 हजार रुपये करणे, मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा 7 हजार रुपये भत्ता देणे आणि सर्व शिक्षकांसाठी 100% कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

तसेच अधिक रजा, विमा कव्हर 2 कोटीपर्यंत वाढवणे, प्रमोशनसाठी सेवा कालमर्यादा कमी करणे, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे आणि निवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे, त्यामुळे आता शिक्षकांचे लक्ष सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button