Latest

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार

राज्यातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची वाट पाहत आहेत, तो क्षण आता जवळ आला आहे ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली लाभार्थी यादी आज, दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्ज माफीची घोषणा केली असून, लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यापूर्वी प्रत्येक माहितीची सखोल पडताळणी केली जात आहे. यावेळी कोणतीही चूक होऊ नये म्हणून बँकांची माहिती, प्राप्तिकर विभागाचा डेटा आणि इतर नोंदींची छाननी सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात सुमारे २५ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनाही आपल्या कर्जाच्या तपशीलाची पडताळणी करावी लागणार आहे.

त्यानंतर अंतिम यादी जाहीर होऊन जुलैअखेर प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे आणि आवश्यक पडताळणीसाठी तयार राहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button