
अहिल्यानगर जिल्ह्यातील दहावी किंवा बारावीमध्ये 85% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनो, तुमच्या मेहनतीचा सन्मान होणार आहे !
शैक्षणिक यश ही केवळ गुणांची गोष्ट नसते, तर त्यामागे असते कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्द. अशाच गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी “दिव्य मराठी सन्मान प्रतिभावंतांचा 2026” हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील दहावी आणि बारावी परीक्षेत 85 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणारा आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारा क्षण ठरणार आहे.
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादा विद्यार्थी या निकषात बसत असेल, तर त्याने त्वरित नोंदणी करावी. तुमच्या यशाची दखल घेतली जाणे ही अभिमानाची बाब आहे. तर मग वाट कसली बघताय विद्यार्थी मित्रांनो आजच रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॉमेंट करा 85 मी तुम्हाला DM मध्ये लिंक सेंड करतो





