
सोन्याच्या बाजारात पुन्हा मोठी हालचाल सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत भाव घसरले, पण आता पुन्हा तेजीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसमोर एकच प्रश्न आहे, सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का?
तर मंडळी, २०२७ मध्ये सोन्याचा भाव १० ग्रॅममागे २ लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘फायनान्शियल टाइम्स’च्या अहवालानुसार, जागतिक तणाव, अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे सोन्याला आधार मिळू शकतो.
विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये केंद्रीय बँकांनी सुमारे ६३ टन सोन्याची खरेदी केली. नोव्हेंबर २०२४ नंतरची ही सर्वाधिक मासिक खरेदी असल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र, सोन्याचे भाव नेहमीच वाढतील याची खात्री नाही.
रुपयाचे मूल्य, व्याजदर आणि बाजारातील मागणी यांचाही किमतींवर परिणाम होतो. त्यामुळे केवळ भाव वाढतील या अपेक्षेने गुंतवणूक करू नका. खरेदीपूर्वी आर्थिक परिस्थिती आणि गरज लक्षात घ्या.





