
सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच! सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळ्याच्या दरात ६०० रुपयांची घसरण होऊन तो १,५७,०४० रुपयांवर आला आहे. म्हणजेच ज्यांना लग्नसराईसाठी जास्त सोन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी १० तोळे सोनं ६,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या दरातही ५५० रुपयांची घट झाली असून १ तोळ्याचा दर १,४३,९५० रुपये इतका आहे. तर १८ कॅरेट सोनंही ४५० रुपयांनी स्वस्त झालं असून १ तोळ्यासाठी १,१७,७८० रुपये मोजावे लागतील.
विशेष म्हणजे सोन्याचे दर कमी झाले असताना चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सध्या १ ग्रॅम चांदी २८० रुपये तर १ किलो चांदी २.८० लाख रुपयांवर विकली जात आहे. सोन्यात गुंतवणूक किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार असेल, तर सध्याची दरकपात ग्राहकांसाठी चांगली संधी ठरू शकते.





