
नगरच्या राजकारणात एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले तीन नेते पुढे एकाच नात्याच्या धाग्यात बांधले गेले. नेमकं कसं जुळलं हे नातं ? चला जाणून घेऊया, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, भानुदास कोतकर, शिवाजीराव कर्डिले आणि अरुणकाका जगताप ! या तिघांचाही नगरच्या राजकारणावर मोठा प्रभाव होता.
एकेकाळी कोतकर आणि कर्डिले यांच्यात राजकीय संघर्ष इतका टोकाला होता की, दोघे एकाच व्यासपीठावर येतील असं कुणाला वाटलं नव्हतं.
मात्र, पुढे संदीप कोतकर आणि सुवर्णा कर्डिले यांचा विवाह झाला आणि दोन्ही घराणी व्याही झाली. दुसरीकडे, भानाभाऊंच्या कन्येचा विवाह अरुणकाका जगताप यांचे पुत्र सचिन जगताप यांच्याशी झाला.
अशा प्रकारे कोतकर, कर्डिले आणि जगताप ही तीन राजकीय घराणी नात्याने जोडली गेली. राजकारणातली स्पर्धा बाजूला ठेवून नात्यांची ही अनोखी नाळ नगरच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय ठरली. तर मग मंडळी तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.





