
आधी भाजपच्या माजी नगरसेवकाच्या भावावर जीवघेणा हल्ला आणि आता आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला झाल्याचा आरोप ! या घटनांमुळे जामखेडमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे या घटनांवर संताप व्यक्त केला. पोलीस कर्मचारी कुलदीप घोळवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी थेट गृह विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.
जामखेडची काळजी केवळ निवडणुकीपुरतीच दाखवणारे आणि आज घटनात्मक पदांवर बसलेले नेते आता गप्प का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. या विधानातून त्यांनी सभापती राम शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नगरपरिषद निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना पाठबळ दिलं होतं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पोलिसांवरच हल्ले होत असतील, तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचं काय? आता गृह विभाग या प्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





