Latest

पंढरीच्या वाटेवर असतानाच काळाचा घाला; श्रीगोंद्याच्या कोसेगव्हाण सोसायटीच्या माजी उपाध्यक्षचा अपघाती मृत्यू

विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने घरातून निघाले… पण काही किलोमीटरच अंतर पार होताच काळाने त्यांना कायमचं हिरावून नेलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण गावावर शोककळा पसरवणारी ही घटना आहे.

कोसेगव्हाण सेवा संस्थेचे उपाध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य 68 वर्षीय ज्ञानदेव अण्णा चव्हाण आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र गुरुवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ता अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही बातमी गावात पोहोचताच हळहळ व्यक्त करण्यात आली. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आणि गावाच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे ज्ञानदेव चव्हाण यांच्या अचानक झालेल्या निधनाने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

भक्तीचा प्रवास सुरू झाला होता, पण नियतीने तो अर्ध्यावरच संपवला. या घटनेमुळे परिसरात शोकाचे वातावरण असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button