
आता पुढील 15 दिवस पावसाची मोठी उघडीप राहणार नाही, असा दिलासादायक अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, १७ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पावसाची शक्यता आहे.
दररोज राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसतील, त्यामुळे पावसाचा खंड फार काळ राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते.
मात्र या अंदाजामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळू शकते आणि उभ्या पिकांनाही आवश्यक ओलावा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांना मोठा आधार मिळू शकतो.
हा पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेला हवामानाचा अंदाज आहे. हवामानात वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांवरही लक्ष ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.





