
अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार अद्याप समोर आले नसल्याचा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.
धीरजसिंह यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. गरज पडल्यास मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात नेण्याची भूमिकाही त्यांनी मांडली. द
रम्यान, हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर बंदची हाक दिली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या, तर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
संवेदनशील भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. धीरजसिंह यांच्यावर भगवा टिळा लावल्याने वाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणून या हत्येमागे नेमका सूत्रधार कोण आणि कट पूर्वनियोजित होता का, याचा उलगडा आता पोलिस तपासातून होणार आहे.





