Latest

जलजीवन असूनही सव्वालाख लोकांना टँकरचे पाणी; योजनेसाठी ९०० कोटींचा खर्च तरीही ८३० पैकी ५५६ योजना अपूर्ण

अहिल्यानगरमध्ये जलजीवन योजनेचा मोठा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलंय. तब्बल ९०० कोटी रुपये खर्च झाले, पण तरीही सव्वालाख लोकांना आजही टँकरचं पाणी प्यावं लागत आहे. मंडळी, केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जलजीवन योजना २०२० मध्ये सुरू झाली होती.

अहिल्यानगर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ८३० योजना सुरू करण्यात आल्या. यातून ९२७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार होता. पण धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या सहा वर्षांत ९०० कोटी रुपये खर्च होऊनही केवळ २७४ योजना पूर्ण झाल्या आहेत, तर तब्बल ५५६ योजना अजूनही अपूर्ण आहेत.

इतकंच नाही, तर दीडशेहून अधिक योजनांचे पाणी स्त्रोतच आटले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे योजना असूनही प्रत्यक्षात पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या जिल्ह्यात ८९ गावे आणि ३९७ वाड्यावस्त्यांमधील १ लाख ३२ हजारांहून अधिक लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी तब्बल ४७ टँकर वापरले जात आहेत आणि उन्हाळा वाढत जाईल तशी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मंडळी, हा फक्त पाण्याचा प्रश्न नाही, तर व्यवस्थापन आणि नियोजनावर मोठा प्रश्नचिन्ह उभं करणारा मुद्दा आहे. यावर तुमचं मत काय? कमेंट करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button