
मतदारयादी पुनरीक्षण मोहीमेवरुन नगरमध्ये आयोजित एका मोर्चादरम्यान शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी विखे पाटील आणि महायुती सरकारला धारेवर धरले. पालकमंत्री आणि सरकारला सर्वसामान्य नागरिकांचे काहीही देणेघेणे उरलेले नाही.
पालकमंत्री फक्त लोणी गावचे मंत्री आहेत, असा आरोप दानवे यांनी केला. दानवे यांच्या याच टिकेला उपमहापौर धनंजय जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. महाविकास आघाडीचे हे आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावलं.
दानवे हे प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेला राजकीय रंग देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सध्या पालकमंत्री दुष्काळ पाहणी दौऱ्यात व्यस्त आहेत.
शेतकऱ्यांना मदत करण्याचा त्यांचा अटोकाट प्रयत्न सुरु आहे, परंतु विरोधक फक्त पक्षाचा स्वार्थ साधून मुद्दा भरकटत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांच्या या भ्रामक आरोपांना उत्तर देण्यास त्यांना वेळच नाही, अशा शब्दांत त्यांनी दानवेंना आरसा दाखवला.





