Latest

गुन्हा २०१७ चा, अटक २०२६ मध्ये….; नऊ वर्षांनंतर अहिल्यानगर पोलिसांना मोठं यश ! बलात्काराचा आरोपी असा पकडला

अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांनी तब्बल नऊ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला श्रीगोंद्यातून अटक केली आहे. रिपुस उर्फ इपुस मेहरा भोसले, रा. लोणीव्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे.

२०१७ मध्ये त्याच्याविरोधात बलात्कारासह अपहरण आणि इतर गंभीर आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत ओळख लपवून वावरत असल्याची माहिती आहे.

फरार आणि वॉन्टेड असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. याचदरम्यान, रिपुस भोसले श्रीगोंद्यात येणार असल्याची गुप्त माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली.

त्यानुसार शनिचौक परिसरात सापळा रचण्यात आला. संशयास्पदरीत्या फिरताना त्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीनंतर त्याची ओळख पटली आणि पोलिसांनी त्याला अधिकृतरीत्या अटक केली.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button