
“कर्जमाफी कधी होणार?” या प्रश्नाचं उत्तर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी पूर्ण केली जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे पुढील खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना शेतकऱ्यांकडून CIBIL स्कोअरची मागणी न करण्याचे आणि कर्ज देताना कोणतीही अडचण निर्माण न करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी कर्जवितरणाचे 80 टक्के लक्ष्य पूर्ण करावे, असेही सांगितले.
एल निनो आणि कमी पावसाच्या अंदाजामुळे सरकारने जलयुक्त शिवार, पाणी नियोजन आणि पीक पद्धतीवर विशेष भर दिला आहे. याशिवाय “महाविस्तार” अॅपद्वारे शेतकऱ्यांना AI च्या माध्यमातून शेतीसंबंधी माहिती आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे.





