Latest

श्रीगोंद्यात चपलांच्या दुकानात गांजाची विक्री…; फुटवेअर दुकानाच्या चौकशीवेळी पोलीसही झाले शॉक! नेमकं काय घडलं ?

अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात एका फुटवेअर दुकानातून गांजा विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोदडे महाराज मठाजवळील साईसेवा फुटवेअर दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत मोठी कारवाई केली.

१५ ऑक्टोबर रोजी पोलिसांना या दुकानातून गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष दुकानाची झडती घेण्यात आली. यावेळी कापडी पिशवीत तब्बल २ किलो १६७ ग्रॅम गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजासह एकूण १ लाख ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सागर अविनाश बोराडे या ३४ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

चौकशीदरम्यान हा गांजा जामखेड तालुक्यातील चौंडी येथील अक्षय नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचं समोर आलं. त्यामुळे दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button