
अहिल्यानगर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरातील प्रसिद्ध हॉटेल्स आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. हॉटेल संदीप, हॉटेल सचिन आणि कोतकर यांच्या निवासस्थानावर छापेमारी झाल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
मंडळी या कथित कारवाईमुळे अहिल्यानगरच्या व्यावसायिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आयकर विभागाकडून नेमकी कोणती तपासणी सुरू आहे?
आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे का? या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रं हाती लागली आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मात्र, या छापेमारीबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कारवाईचं नेमकं स्वरूप आणि त्यामागचं कारणही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या वृत्ताला प्राथमिक माहिती म्हणूनच पाहणं महत्त्वाचं आहे.
आता सर्वांचं लक्ष आयकर विभागाच्या अधिकृत भूमिकेकडे लागलं आहे. या कथित कारवाईमागचं सत्य काय, हे अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल.





