
व्हॉट्सॲपवर एका मेसेजसाठी आता १४ पैसे मोजावे लागणार? १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पण सर्वसामान्यांना टेन्शन घेण्याची गरज आहे का?
व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून WhatsApp Business Platform च्या मेसेजिंग शुल्कात बदल होणार आहे. यानुसार व्यावसायिक संदेशांसाठी कंपन्यांना प्रति मेसेज शुल्क द्यावे लागणार आहे.
विशेष म्हणजे, बँकेचे OTP, बॅलन्स अलर्ट, ऑनलाइन शॉपिंगच्या डिलिव्हरी अपडेट्स आणि ग्राहक सेवेसाठी पाठवल्या जाणाऱ्या संदेशांचा खर्च कंपन्यांना करावा लागेल. काही संदेशांसाठी GST धरून सुमारे १४ पैसे खर्च होऊ शकतात.
मात्र, सर्वसामान्य व्हॉट्सॲप युजर्ससाठी दिलासादायक बाब म्हणजे वैयक्तिक चॅटिंग पूर्णपणे मोफत राहणार आहे. मित्रांना मेसेज पाठवणे, फोटो शेअर करणे किंवा व्हिडिओ कॉल करण्यासाठी कोणतेही नवीन शुल्क लागणार नाही.
म्हणजेच, पैसे ग्राहकांना नाही, तर संबंधित व्यावसायिक कंपन्यांना मोजावे लागणार आहेत!





