Latest

मोठी बातमी ! कांद्याचे बाजारभाव आणखी वाढले, अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये कांद्याचे भाव ५८०० रुपयांवर !

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात कांद्याचे रेट ६००० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचलेत.

राहता बाजारात मंगळवारच्या लिलावात कांद्याची आवक वाढून तब्बल ४ हजार ६८४ गोण्यांची नोंद झाली. पण गुणवत्तेनुसार कांद्याच्या दरात मोठी तफावत पाहायला मिळाली.

नंबर एक कांद्याला ४ हजार ५०० ते तब्बल ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला. नंबर दोन कांद्यासाठी २ हजार ९०० ते ४ हजार ४५० रुपये दर मिळाला. तर नंबर तीन कांद्याचा भाव १ हजार ३०० ते २ हजार ८५० रुपयांदरम्यान राहिला.

गोल्टी कांद्याला १ हजार ५०० ते ४ हजार १०० रुपये, तर जोड कांद्याला ७०० ते २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीपूर्वी आपल्या मालाचा दर्जा आणि बाजारातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button